RELIGIOUS ACTIVITIES

धार्मिक उत्सव/कार्यक्रम

श्री दत्त जयंती हा संस्थेचा प्रमुख उत्सव! या उत्सवात पहाटे 5 वाजल्यापासून रात्रि 11 पर्यंत ‘‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’’ नामजपाचा पहारा चालू असतो. दिवसा औदुंबराखाली सप्ताहभर श्री गुरूचरित्र पारायण चालू असते. रात्रि आरती व कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होतो. दत्त जन्माचे कीर्तन ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने भक्त एकत्रित होतात. महाप्रसादाने उत्सवाची सांगता होते.

सनातन भारतीय संस्कृतिचे रक्षण, स्वधर्माबद्दल स्वाभिमान व निष्ठा जागृत करून राष्ट्रोद्धाराच्या कार्याकरितां समाजाला प्रेरित करणे हे संस्थेचे प्रथम कर्त्तव्य आहे. याच अनुषंगाने वेद, पुराण-निरूपण, प्रवचने, कीर्तने, चार्तुमास, ऋक् श्रावणी, सूर्य नमस्कार, जप, यज्ञ, वेदपठन, श्रीराम नवमीं, गोकुळ अष्टमी, महाअष्टमी, कार्तिक मास काकड आरती, श्री दास नवमीं, भागवत सप्ताह, गुरू पौर्णिमा, गुडी पाडवा, शैलगमन यात्रा, इ. कार्यक्रम मंडळाकडून साजरे होतात.