ABOUT US
श्रीदत्त भजन मंडळ – परिचय
संस्कृति आणि संस्काराचं केन्द्र, जन जागृति आणि मराठी स्वाभिमान जागृत ठेवणारं तीर्थ, विशाल वास्तू आणि मराठी पुरूषार्थाचं उत्तुंग शिखर म्हणजे ‘‘श्रीदत्त भजन मंडळ.“ या संस्थेने धार्मिक पाश्र्वभूमिवर सामाजिक कार्याचे अनेक प्रेरणादायी आदर्श प्रस्तुत केले आहेत. विद्यार्थी सहायक निधि, निःशुल्क होम्योपैथिक चिकित्सालय, भव्य वास्तू, युवा सशक्तीकरण, या क्षेत्रात नवीन उच्चांक गाठण्याÚया या संस्थेचा मार्ग अतिशय कठीण होता, आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे या उक्तीला सार्थ करणाÚया या संस्थेचा इतिहास बघण्यासाठी 90 वर्ष पूर्वीच्या काळात जावे लागेल.
श्रीदत्त भजन मंडळ संस्कृति आणि संस्कारांचे केन्द्र, सार्वजनिक श्रद्धा आणि मराठी अस्मिता जागृत करणारे तीर्थक्षेत्र, महान वास्तू आणि मराठी प्रयत्नांचे उच्च शिखर आहे. जबलपुर ही जाबाली ऋषिंची तपोभूमि म्हणून ओळखले जाणारे हे शहर परम पावन नर्मदा नदीच्या काठावर वसलेले आहे. ‘‘पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा’’ राष्ट्रगीताच्या या ओळी या शहराने सार्थ केल्या आहेत म्हणून देशातील प्रत्येक राज्याची सांस्कृतिक छटा या शहरात दिसून येते.
जबलपुरातील मराठी समाजाने 1932 साली प्रभु श्रीदत्तात्रेयांस आपले दैवत मानून गुरूवारच्या भजनास प्रारंभ केला आणि या अंकुरीत बीजाने ‘‘श्री दत्त भजन मंडळाची’’ स्थापना झाली.
स्वातंत्राच्या 15 वर्ष पूर्वी स्वधर्म आणि राष्ट्रासाठी काहीतरी करावे या उद्देशाने काही भाविक दर गुरूवारी एकत्र येऊन भजन करू लागले. भजनासोबतच स्वधर्म व स्वराष्ट्रत्वासाठी जगण्याची इच्छा आकार घेऊ लागली. शास्त्रीय संगीताच्या आधारावर भजने व पंचपदी गाण्याची प्रथा सुरू झाली ती आजदेखील अविरत सुरूं आहे. स्वतंत्र्याची चळवळ सुरू असतांना ‘‘वंदे मातरम्’’ म्हणणे देशद्रोह मानला जात असे. कायद्याच्या बंधनांना झुगारून संस्थेने गुरूवारी राष्ट्रगीत गाउन राष्ट्रभक्तिची ज्योत तेवत ठेवली होती. ही परंपरा आजदेखील सुरूं आहे. धार्मिक संस्थांमध्ये श्रीदत्त भजन मंडळच एक अशी संस्था आहे, ज्या प्रासादांत आजही ‘‘वंदे मातरम्“ चे गायन होते.
संस्थेची स्थापना 1932 साली पुसदकरांच्या वाड्यांत झाली. नंतर मंडळाचे स्थान परिवर्तन होऊन श्री रामचंद्र वैद्य यांच्या घरात व नंतर कै. पांडुरंग विष्णु फाटक यांच्या घरात संस्थेचे कार्य सुरू झाले.
श्रीदत्त भजन मंडळ संस्थेच्या अवघ्या दोन वर्षात ‘‘विद्यार्थी सहायक निधी योजनेने आकार घेतला व हा प्रकल्प आजपर्यंत सतत सुरूं आहे.
सन् 1939 मध्ये स्वातंत्रवीर वीर सावरकरांचें ही श्रीदत्त भजन मंडळात आगमन झाले होते. दत्त भजन मंडळाचा लौकिक वाढू लागला होता. संस्थेच्या उत्कर्षासाठी कार्यकर्ते घरोघरी जाऊन पैसा गोळा करू लागले. पुढे संस्थेने 12 फेब्रुवारी 1946 मध्ये 1.5 एकर जमीन विकत घेतली व तेथे मंदिराच्या प्रथम चरणात 12 बाय 50फुट जागेत लाकडाच्या फळयांची झोपडी बाांधण्यात आली. 29 आॅगस्ट 1947 साली ‘‘श्रीं ’’च्या छाायाचित्राची भव्य मिरवणूक काढून संस्थेची आपल्या स्वतःच्या जागेत स्थापना झाली.
मंदिराच्या बांधकामासाठी एक समिति स्थापन करण्या आली. ज्यामधे वैद्यराज वी. डेग्वेकर, अध्यक्ष, श्री स. ल. परांजपे सचिव, प्र. न. नावलेकर, एन. जी. लेले, एन. एल. जोशी, वि श्री देसाई, कृ. दाभोळकर हे सदस्य होेते. संस्थेचा सुवर्णदिन 21 डिसेंबर 1950 रोजी आला. त्या दिवशी मंदिरात बांधकामासाठी भूमि पूजनाचे कार्य संस्थेचे सचिव स. ल. परांजपे यांच्या हस्ते पूर्ण झाले. 3 डिसेंबर 1951 साली भव्य मंदिराची वास्तूशांती व उद्घाटन समारंभ झाला.
श्री दत्त मंदिराने ‘‘श्री दत्तात्रय’’ देवतेची मूर्ति स्थापना दिवस 1857 च्या स्वतंत्रता संग्रामाचे शताब्दी वर्ष व छत्रपति शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी आयोजित केला. 10 जून 1957 ला श्री दत्त मूर्तिची स्थापना दत्तावतार स्वामी वासुदेवानंदजींचे उत्तराधिकारी स्वामी प्रज्ञानंद सरस्वती यांच्या सानिध्यात श्री गंगाधर बेडेकर यांच्या हस्ते करण्यात आली.
3 सप्टेंबर 1964 रोजी मंगल कार्यालय तयार झाले. मराठी माणसांना लग्न, उपनयन संस्कार, आदी अनेक मंगल कार्यांसाठी एक निश्चित असे स्थान मिळाले व त्यायोगे मंदिराला नियमित उत्पन्न देखील सुरू झाले.
कालमानानुसार मंगल कार्यालय विस्ताराची आवश्यकता भासली आणि शहरातले प्रतिष्ठित व्यवसायी श्री शं. वि. मुठ्ये यांचे द्वारा कार्यालयाकरिता देणगी दिली गेली व त्या भवनाचे नाव ‘‘विट्ठल वामन मुठ्ये सभागृह’’ असे ठेवले गेले. सभागृहाचे निर्माण कार्य 1969 मध्ये पूर्ण झाले.
मंदिराच्या प्रगतिच्या वाटचालीत 10 एप्रिल 1978 वर्ष प्रतिपदेच्या दिवशी श्री दत्त महाद्वाराचे उद्घाटन तत्कालिन म. प्र. विधानसभा अध्यक्ष मुकुंद सखारम नेवाळकर यांच्या शुभहस्ते सम्नन्न झाले.
वर्ष 2020 मधे मुठये भवनाच्या प्रथम तलावर भव्य प्रेक्षागृह व मंचाचे निर्माण कार्य पूर्ण झाले.
वर्ष 2018 मध्ये मंदिराच्या प्रासादांत पेवरब्लाॅक चे फर्शीकरण करण्यात आले.
धार्मिक उत्सव/कार्यक्रम:- श्री दत्त जयंती हा संस्थेचा प्रमुख उत्सव! या उत्सवात पहाटे 5 वाजल्यापासून रात्रि 11 पर्यंत ‘‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’’ नामजपाचा पहारा चालू असतो. दिवसा औदुंबराखाली सप्ताहभर श्री गुरूचरित्र पारायण चालू असते. रात्रि आरती व कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होतो. दत्त जन्माचे कीर्तन ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने भक्त एकत्रित होतात. महाप्रसादाने उत्सवाची सांगता होते.
सनातन भारतीय संस्कृतिचे रक्षण, स्वधर्माबद्दल स्वाभिमान व निष्ठा जागृत करून राष्ट्रोद्धाराच्या कार्याकरितां समाजाला प्रेरित करणे हे संस्थेचे प्रथम कत्र्तव्य आहे. याच अनुषंगाने वेद, पुराण-निरूपण, प्रवचने, कीर्तने, चार्तुमास, ऋक् श्रावणी, सूर्य नमस्कार, जप, यज्ञ, वेदपठन, श्रीराम नवमीं, गोकुळ अष्टमी, महाअष्टमी, कार्तिक मास काकड आरती, श्री दास नवमीं, भागवत सप्ताह, गुरू पौर्णिमा, गुडी पाडवा, शैलगमन यात्रा, इ. कार्यक्रम मंडळाकडून साजरे होतात.
श्रीं ची नित्यपूजा:- मूर्तिस्थापने पूर्वी श्री दत्तात्रेयांच्या छायाचित्राची नित्य पूजा पुष्पमाळा घालून होई. मूर्तिच्या प्राणप्रतिष्ठे पासून श्री दत्तात्रेयांची त्रिकाल पूजा अर्चा, आरती, नैवेद्य व शेजारती होत असते.
श्रीं ची शाश्वत पूजा:- श्री दत्तात्रेयांची सकाळ संध्याकाळ पूजा अर्चना निर्बाध चालू रहावी या उद्देश्याने मंडळाने शाश्वत पूजेची योजना क्रियान्वित केली. दानदात्यांकडूनड्ड त्यांच्या प्रिय व्यक्त्च्यिा नांवाने दरवर्षी निर्धारित तिथीलास पूजा व्हावी म्हणून एक निश्चित रकम रूपये 2100/- ठेव स्वरूपात स्वीकारण्यात येते.
मंगल कार्यालय (मुठये स्मृति भवन):- विवाह, उपनयन व अन्य कार्यक्रमासाठी समाजाला बैठकी, सम्मेलने, शैक्षणिक सभा, व्याख्यानमाला, गणपति उत्सव, योगाासनांचे शिविर, सामुदायिक मंगळागौर, हरतालिका पूजन, सोळा सोमवार व्रत उद्यापन इत्यादि धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांकरितास भवनाचा उपयोग होतो.
गणेश कुटी:- सर्व सुविधायुक्त प्रशस्त खोल्या. एक छोटेखानी हाॅल, स्वतंत्र स्वयंपाक घर, लग्न प्रसंगी वधूपक्षास सोयीस्कर जागा. मंगळागैर, बारसे, वाढदिवस साजरे करण्यासाठी अत्यंत अल्प दरात टुमदार व्यवस्था.
एयर कूल्ड रूमस्:- लेट बाथ अटैच चार स्वतंत्र खोल्या त्यात डबल बेड, मोठी कपाटे, गीज़र, टेबल खुच्र्या आदि सुविधानी युक्त आरामदायक स्वतंत्र ब्लाॅक, त्याच्याच शेजारी एक स्वतंत्र हाॅल.
पुजारी निवास:- श्रींच्या पूजेत कोणात्याही प्रकारचे विघ्न येउ नये म्हणून रहिवासी पुजारी व्यवस्था करण्यात आली आहे. दोन पुजाÚयांसाठी निवासाची व्यवस्था आहे.
सामुदायिक भवन:- नर्मदा परिक्रमावासीयांच्या निवासासाठी सामुदायिक भवनाची योजना सांसद निधितून साकार झाली.
विद्यार्थी सहायता निधि:- गरीब परंतु होतकरू महाराष्ट्रीय विद्याथ्र्यांना विद्यार्जनास मदतीकरता मंडळाने वर्ष 1934 पासून ही योजना प्रारंभ केली. या निधितून गरीब विद्याथ्र्यांना आर्थिक मदत करण्यात येते.
धर्मार्थ औषधालय:- वर्ष 1988 पासून मंडळाने होम्योपैथी औषधालयाची स्थापना केली. रूग्णांना संस्थेकडून औषधे व चिकित्सकीय परामर्श निःशुल्क देण्यात येतो. औषधालयात येणाÚया रूग्णांची मासिक संख्या सरासरी 600 आहे.
मकर संक्रमण व्याख्यानमाला:- सन् 1983 पासून मंडळाने ज्ञान सत्राच्या रूपात लोकमान्य तिळक स्मृति मकर संक्रमण व्याख्यापमालेला प्रारंभ केला.
बाल तरूण समाज:- मंडळाच्या अंतर्गत कार्यकरणारी युवकांची संस्था आहे. श्री गणेशोत्सव, मराठी नाटके, कोजागिरी, तिळगुळ समारंभ, गरबा उत्सव, मराठी विद्यार्थी गौरव पुरस्कार या माध्यमतून ही संस्था जनहितसेवा कार्य करीत असते.
धार्मिक ग्रंथालय:- संस्थेचे एक धार्मिक अभ्यास केन्द्र असावे या उद्देशाने संस्थेने मुबलक प्रमाणात धार्मिक वाङमयाचा संचय केला आहे. यात वेद, 18 पुराणे, उपनिषदे, योग वशिष्ठ, महाभारत, रामायण, ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा आदि अभ्यासात्मक ग्रंथांचा समावेश आहे.
भक्त निवास:- समाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यासाठी परगाावाहून येणाÚया मराठी पाहुण्यांची निवासाची सोय केली जाते.
अशा प्रकारे विविध अंगांनी आणि विविध प्रकारे जनसेवा आणि जनहित साधण्याचा संस्थेचा अविरत प्रयत्न सुरूं असतो.
आपणा सकल सद्भक्तांना श्रींचे सदैव शुभ आशीर्वाद असोत हीच श्रींचे चरणी विनम्र प्रार्थना!
विजय भावे शरद आठले
अध्यक्ष सचिव
श्रीदत्त भजन मंडळ
गोल बाजार, जबलपुर.